चाळीसगावातील वृद्धाला लग्नसमारंभात मारहाण : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


चाळीसगाव : मामे भाऊंच्या विवाहात गेलेल्या वयोवृद्धाला काही एक कारण नसताना लाकडी दांड्यांनी जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

दोघांविरोधात गुन्हा दाखल
चाळीसगाव शहरातील प्रबुद्ध नगरातील चंदर रिचपाल चव्हाण (६२) हे मामे भाऊंच्या विवाहात गेले असता तु येथे का आला या किरकोळ कारणावरून दीपक जगदीश गोयर उर्फ भुऱ्या व साहिल प्रेमा गुजराथी (दोन्ही रा. नगरपालिका कॉलनी, चाळीसगाव) यांनी जबर मारहाण केली. त्यापैकी दीपक जगदीश गोयर उर्फ भुऱ्या यांनी लाकडी दांड्यांनी चंदर चव्हाण यांच्या डोक्यात जबर मारहाण केली. यात चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता शहरातील हिरापूर रोडवर घडली. दरम्यान चव्हाण यांना गंभीर दुखापती झाल्याने पुढील औषधोपचाराकामी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास किशोर सोनवणे हे करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !