चाळीसगावात चारीत्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून
चाळीसगाव : चारीत्र्यावर संशय घेऊन पतीने दगडाने ठेचून निघृणपणे पत्नीची हत्या केली. ही घटना शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा परीसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.
संशयातून केला खून
याबाबत वृत्त असे की, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील प्रकाश उर्फ भुरा सोनवणे हे आपल्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने चाळीसगाव शहरातील पीरमुसा कादरी बाबा दर्गा येथे आलेले असताना चारीत्र्यावर संशय घेऊन सोनवणे यांनी दगडाने ठेचून पत्नीचा निघृणपणे हत्या केली. मायाबाई प्रकाश उर्फ भुरा सोनवणे (४०) असे मृत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ही धक्कादायक घटना शनिवार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास शहरातील पीरमुसा कादरी बाबा दर्गा परीसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी प्रकाश उर्फ भुरा सोनवणे याला ताब्यात घेतले आहे. भारतीबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहा.निरीक्षक दीपक बिरारी हे करीत आहेत.





