छत्रपती शिवरायांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर जळगावात राज्यपाल कोश्यारींनी अशी दिली प्रतिक्रिया !


जळगाव : औरंगाबादमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जळगावात नेमके काय बोलणार ? याकडे लक्ष लागले होते. प्रसिद्धी माध्यमांनी औरंगाबादमधील वक्तव्याचा संदर्भ देत थेट राज्यपालांना प्रश्न विचारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे स्त्रोत आहेत. त्यांच्याबाबत इतिहासातील काही नवीन तथ्य लोकांनी मला सांगितल्यानंतर या तथ्यांनुसार मी माहिती घेतो, असे ते म्हणाले.

वक्तव्याचा निषेध : राजीनाम्याची मागणी
राज्यपाल कोश्यारी यांचा दोन दिवसांचा जळगाव दौरा होता. सोमवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जलतरण तलावचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभरात आंदोलने छेडली जात आहे. राज्यपालांनी केलेले वक्तव्य मागे घ्यावे आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राज्यातून केली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतसेच लोकसंघर्ष मोर्चा कडुन काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला. मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !