बीड शहरात 51 लाखांची रोकड जप्त : हवाला व्यवहार करणार्‍या तिघांना अटक


बीड : बीडमध्ये सोमवारी पोलिसांनी हवाला रॅकेट उघडकीस आणले. केजचे सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने शहरात तीन ठिकाणी कारवाई करत 51 लाखांची रक्कम जप्त केल्याने बेकायदा व्यवहार करणार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

कारवाईने उडाली खळबळ
करचुकवेगिरी करून पैशांचा बेकायदा व्यवहार करणारे हवाला रॅकेट चालवणार्‍या तीन फर्मच्या तीन व्यवस्थापकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राप्तिकर चुकवून टोकन पद्धतीने पैशांची फिरवाफिरवी करणारे काही जण बीडमध्ये हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती कुमावत यांना मिळाली व त्यानंतर पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !