आधी तरुणीशी ठेवले प्रेमसंबंध नंतर सोशल मिडीयावर अश्लील व्हिडिओ केला व्हायरल
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तरुणीशी आधी प्रेमसंबंध ठेवून नंतर व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल करून अश्लिल व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील तरुणाविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
तरुणीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल
जळगाव शहरातील एका भागातील 22 वर्षीय तरूणीचे चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या तरूणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून तरुणाने एकेदिवशी तरूणीला तिच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल केला व तरुणीला विवस्त्र होण्यास भाग पाडून त्याचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून तो मित्राला व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला. या प्रकाराने तरुणीची बदनामी झाल्याने तरुणीने मंगळवार 1 मार्च रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिल्यावरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.





