शेतकर्‍याच्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाही म्हणून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या


suraj jadhav suside पंढरपूर : महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे वीज तोडणी झाल्यानंतर वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकर्‍याने शेतकर्‍याच्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाही, असे म्हणत व्हिडिओ व्हायरल करून आत्महत्या केली. सुरज जाधव (पंढरपूर) (suraj jadhav) असे या शेतकर्‍याचे नाव आहे.

विष प्राशन करीत आत्महत्या
सुरज (suraj jadhav) हा पंढरपूर येथील मगरवाडी गावातील शेतकरी होता व वीज तोडणी आणि महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून सूरजने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. आत्महत्येपूर्वी तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात शेतकर्‍याच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही. गेम इज ओव्हर. आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं. इथून पुढं आयुष्य नाही. कारण शेतकरी नामर्द आहे. सरकारही शेतकर्‍यांचा विचार करणार नाही. जोपर्यंत शेतकरी आहे तोपर्यंत सरकार नाही, असेही सुरजने म्हटले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !