एकतर्फी प्रेमातून होणारा त्रास असह्य ; म्हणूनच या शहरातील विवाहितेने उचलले असे टोकाचे पाऊल
नांदेड : एकतर्फी प्रेमातून होणार्या त्रासातून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना जागतिक महिला दिनीच नांदेडमध्ये उघडकीस आलीय. बिलोली तालुक्यातील आटकळी गावातील ही दुर्दैवी घटना आहे.
त्रासाला वैतागून उचलले पाऊल
गावातील आरोपी परमेश्वर कळसे हा महिलेला एकांतात भेटण्यासाठी दबाव आणत होता. लग्नापूर्वी देखील हा आरोपी या महिलेवर अश्याच प्रकारे दबाव आणत होता. या महिलेचे लग्न झाले तरी आरोपी सासरी जाऊन तिला त्रास देतच होता. त्याला वैतागून महिलेने विष प्राशन केले.


