गोलाणी मार्केटमध्ये ‘पॅरागॉन कंपनीच्या’ नावाचा बनावट चपलांची विक्री : विक्रेत्याविरोधात कारवाई
Jalgaon Golani Market Red जळगाव : नामांकीत पॅरागॉन कंपनीच्या नावाने बनावट माल विक्री (Sale of counterfeit goods in the name of Paragon Company) करणार्या विक्रेत्यावर जळगाव शहर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील गोलाणी मार्केटमधील ए विंगमधील दुकाननंबर 216 मधील जयेश फूटवेअर येथे कारवाई करीत बनावट फुटवेअरचा साठा जप्त करण्यात आला.
फूट वेअर विक्रेत्याविरोधात गुन्हा
कोल्हापूर येथील श्रेयस कोरवी हे सह्याद्री कॉपीराइट प्रोटेक्शन या फर्ममध्ये फिल्ड ऑफीसर म्हणून नोकरीला आहे. त्यांना पॅरागॉन (Paragon Company) पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड यांनी पॉवर ऑफ अर्टनी दिली आहे. या कंपनीचा बनावट माल विक्री होणार्या ठिकाणी जावून तेथे छापा टाकून कारवाई करण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत. त्यानुसार पॅरागॉन कंपनीचा (Paragon Company बनावट माल शहरातील गोलाणी मार्केटमधील ऐ विंगमधील दुकाननंबर 216 मधील जयेश फूटवेअर येथे विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. याठिकाणी कारवाई करण्यासाठी त्यांनी ठाणे अंमलदार संजय झाल्टे यांना पत्र दिले.





बनावट फूट वेअरचा साठा जप्त
पोलिसांना पत्र दिल्यानंतर पोलिस निरीक्षक ठाकूरवाड यांच्या आदेशानुसार प्रफुल्ल धांडे व योगेश बोरसे यांच्यासह कंपनीचे अभिजीत भोसले, रितेश खैरनार यांच्यासह त्यांनी जयेश फूट वेअर या दुकानावर छापा टाकला. दुकानावर छापा टाकताच याठिकाणी दुकान मालक विजय भगवान राठोड वय-45 रा. कासमवाडी सरस्वतीनगर यांची चौकशी केली. दरम्यान अधिकार्यांनी दुकानाची झाडाझडती घेतली असता, त्यांना दुकानात पॅरागॉन कंपनीच्या (Paragon Company नावाने बनावट माल आढळून आला. तसेच त्यावर कंपनीचे हुबेहुब लेबल लावल्याचे दिसून आले तर फूट वेअर विना बॉक्समध्ये असल्याचे स्पष्ट झाले. फूट वेअर विक्रेता विजय भगवान राठोड याने स्वतःच्या फायद्यासाठी कंपनीचा बनावट मालाची विक्री केल्याने त्याच्याविरोधात कॉपीराईट ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
