वृद्ध आईला काढले घराबाहेर ; मुलासह सूने विरोधात गुन्हा


बुलढाणा : आईच्या नावावरील घर स्वतःच्या नावावर करून घेत 84 वर्षीय वयोवृद्ध आईला घराबाहेर काढून मारहाण करणार्‍या मुलासह सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही धक्कादायक घटना खामगाव शहरातील बर्डे प्लॉट येथे घडली.

वृद्ध आईला घराबाहेर काढले
खामगांव शहरातील बर्डे प्लॉट भागातील मुलगा शेख आसीफ अब्दुल रज्जाक याने आई रहेमत नबी अब्दुल रज्जाक (84) यांचा विश्वासाघात करीत त्यांचे घर स्वतःच्या नावावर बक्षीस पत्र करून घेतले तसेच रहेमत रज्जाक यांना मुलगा व सुनेने मारहाण करून घराबाहेर काढून दिले. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी मुलगा शेख आसिफ अब्दुल रज्जाक व सुन शेहनाजबी शेख आसिफ दोघांविरुद्ध 323, 504 भादंवि सहकलम ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण कल्याण अधिनियम 2007 चे कलम 23,24 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !