भुसावळात पोलिसांच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ : शहरातील श्री रीदयम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शनिवारी भुसावळ विभागातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांसह यावल, सावदा व फैजपूर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांसाठी एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा 140 कर्मचार्यांनी लाभ घेतला. सकाळी 10 वाजता भगवान श्री धनवंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याहस्ते करण्यात येउन या शिबिराचे उद्घाटन झाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू, शहर वाहतूक पोलिस शाखेचे सहाय्यक निरीक्षक स्वप्नील नाईक, शहर व तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, रुग्णालयाचे डॉ.नितीन पाटील, डॉ.लक्ष्मीकांत नागला, डॉ.महेश पांगळे, डॉ.कुशल पाटील, श्री कल्याणी चॅरीटेबलचे गौतम चोरडिया, सुराणा ग्रुपचे समकीत सुराणा, चेस्ट फिजिशीयन्स डॉ.वंदना गवळी, तुलसी डेंटल क्लिनिकचे डॉ.विजय ढाके, नेत्रम रुग्णालयाचे सुनील मेश्राम उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.लक्ष्मीकांत नागला यांनी केले.
विविध आजारांची तपासणी
या शिबिरात श्री रीदम हॉस्पिटलतर्फे प्राथमिक तपासणी, रक्त चाचण्या, रक्तदाब, इसीजी, रक्तातील शुगर सह विविध व्याधीवर उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. डॉ.वंदना गवळी यांनी फफुसाचे आजारा संबंधी तपासणी करुन मार्गदर्शन केले. डॉ.विजय ढाके यांनी दंत तपासणी केली तर नेत्रम रुग्णालयाचे सुनील मेश्राम यांनी नेत्र तपासणी केली. आवश्यक असलेल्याच्या विविध रक्त चाचणी करण्यात आल्या. या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी वाघचौरे यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक करुन पोलिसांनी नियमित आरोग्य तपासणी कराव्यात, असा सल्लाही दिला.


