विवाहितेचा दोन लाखांसाठी छळ : अडावदच्या पतीसह सासर्यांविरोधात गुन्हा
जळगाव : घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अडावदच्या पतीसह सासरच्या पाच संशयीतांविरोधात शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पैसे न आणल्याने केली मारहाण
शहरातील विठोबा नगरातील माहेर असलेल्या रीना सोहन हळदे (24) यांचा विवाह अडावदस्थित सोहन अरुण हळदे यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर पती सोहन हळदे याने विवाहितेने घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत म्हणून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली तसेच विवाहितेच्या आई-वडीलांची परीस्थिती हालाखीची असल्याने पैसे न आणल्याने पतीने विवाहितेला शिविगाळ करून मारहाण केली व धमकी दिली तर सासू, चुलत सासरे, चुलत दीर व नणंद यांनी देखील गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता मोहरी निघून आल्या.





पाच संशयीतांविरोधात गुन्हा
विवाहितेने शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पती सोहन अरुण हळदे, सासू ताराबाई अरूण हळदे (दोन्ही रा.अडावद, ता.चोपडा), चुलत सासरे अनिल बाबुलाल हळदे, चुलत दिर हर्षल अनिल हळदे (रा.वरणगाव) आणि नणंद नुतन योगेश हळदे (रा.अकोट) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलिस नाईक अर्चना भावसार करीत आहे.
