पाच हजारांची लाच गटविकास अधिकार्याला भोवली : कार्यालयातच केली एसीबीने रंगेहाथ अटक
Hingola ACB Trap हिंगोली : पाच हजार रुपयांची लाच घेताना (acb trap) गटविकास अधिकार्याला कार्यालयातच रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. औंढा पंचायत समितीत ही कारवाई झाली. मनोहर खिल्लारी (bdo manoher khillari) असे अटकेतील आरोपी टविकास अधिकार्याचे नाव आहे.
पाच हजारांची लाच भोवली
सध्या शेतकर्यांना शासकीय योजनेतून गुरांचा गोठा व सिंचन विहिरी मंजूर करून अनुदान वाटप सुरू आहे. योजनेचा लाभ देण्यासाठी गटविकास अधिकारी खिल्लारी यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याशिवाय शासकीय योजनेतील जनावरांच्या गोठ्याचे व विहिरीचे कार्यारंभ आदेश देणार नसल्याचे संबंधितास गटविकास अधिकार्यांनी सांगितले होते. त्यामुळे याबाबतची तक्रार हिंगोलीच्या लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती. अधिकार्यांनी केलेल्या पडताळणीत गटविकास अधिकारी हे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाल्याने आज त्यांच्या कार्यालयातच सापळा रचून त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.
लाचखोरांच्या तंबुत घबराट
वरीष्ठ अधिकार्याला लाच घेताना अटक झाल्याने हिंगोली जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी गटविकास अधिकारी खिल्लारी तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारत असतांना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडताच लाचखोरांच्या गोटात थरकाप उडाला.


