भुसावळातील तीन मॉल फोडणार्या मथुरेतील चोरट्यांना बेड्या
भुसावळ : शहरातील मॉडर्न रोडवरील हरेकृष्णा मॉल, गुरूनानक क्लॉथ स्टोअर्स व गोपी सुपर शॉपिंग मॉलमध्ये एकाच वेळी चोरी झाल्याची घटना मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 रोजी पहाटे उघडकीस आली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे उत्तरप्रदेशातील मथुरा येथून दोन संशयीतांना अटक केली आहे. कलवा नबाब खान (23, किशोर पाडा, रुंदावन मथुरा, उत्तरप्रदेश) व श्यामकुमार प्रदीप सैनी (27, आशा नगर, मेहंदी पार्क, मथुरा, उत्तरप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
कॉपी आढळलेल्या शाळेची तत्काळ मान्यता होणार रद्द : शालेय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाजन, हवालदार विजय नेरकर, सचिन चौधरी, जीवन कापडे, सचिन पोळ, प्रशांत लाड आदींच्या पथकाने केली.
-
भुसावळात एकाच रांगेतील तीन दुकाने फोडत नऊ लाखांचा ऐवज लंपास
-
सावद्यात अडीच कोटींची थकबाकी : पतसंस्थांसह नऊ व्यापारी गाळ्यांना सील


