पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी : शासकीय कार्यालयांच्या सुट्या रद्द


पुणे : पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यात गंभीर पूर परीस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने नागरीकांना आवश्यक ती मदत देण्यासाठी सर्व शासकीय विभागांची कार्यालये पूर रीस्थितीच्या निवारणासाठी 10, 11 व 12 ऑगस्टला शासकीय सुट्टी असली तरी ही कार्यालय सुरू राहणार असून त्याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत.
सांगली आणि कोल्हापूरातील पूर स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परीषदेत त्यांनी माहिती दिली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शुक्रवारी सांगलीला 12 हजार लिटर पाण्याच्या बाटल्या आणि एक ट्रक बिस्कीटचे पुडे पोहोचविले. शनिवारी देखील एक हजार पाण्याचे बॉक्स पोचविण्यात येणार आहेत.

या वस्तू मदत म्हणून स्वीकारणार
बिस्कीट, न्यूडल्स, चहा पावडर, टूथपेस्ट-ब्रश, साबण, पाण्याच्या बाटल्या, मेणबत्ती, काडेपेटी, टॉर्च, ब्लँकेट, सतरंजी, टॉवेल, साडी, लहानमुलांची कपडे, मोठ्या माणसांची कपडे आणि आंतरवस्त्र तसेच कपडे द्यायचे असल्यास नवीन देण्यात द्यावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. रोख रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता फंडात जमा करण्याचे आवाहनही करण्यात आले.


कॉपी करू नका.