सोनोटीतील अपूर्णावस्थेत असलेल्या बुद्धविहाराचे काम तत्काळ पूर्ण करा


बोदवड : तालुक्यातील सोनोटी येथे तत्कालीन आमदार एकनाथराव खडसे यांच्या आमदार निधीतून बुद्ध विहार मंजूर करण्यात आले होते शिवाय याबाबतचा निधी सार्वजनिक बांधकाम उपविभाग बोदवड यांच्याकडे प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने बुद्धविहाराचे काम सुद्धा सुरू झालेले होते मात्र उचित कालावधीत काम पूर्ण न झाल्याने व ते आजपोवतो अपूर्णावस्थेत असल्याने व निकृष्ट स्वरूपाचे काम झाल्याने तत्काळ दर्जेदार काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा उपोषण आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

अपूर्ण कामामुळे अनेक अडचणी
गेल्या अनेक दिवसापासून मंजूर असलेले बुद्ध विहार अपूर्णावस्थेत असल्याने समाजबांधवां विविध धार्मिक कार्यक्रम करताना नाहक अडचणी निर्माण होत आहेत. पुढील महिन्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून याआधी हे बांधकाम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अपूर्ण बांधकाम येत्या काही दिवसांत पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी सोनोटी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील बोदडे, श्रीकृष्ण बोदडे, भगवान तायडे यांनी दिला असून निवेदनावर सोनोटी येथील समस्त बौद्ध समाजबांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !