अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


जळगाव : शहरातील एका भागात राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला एका महाविद्यालयातून पळवून नेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताचा पोलिसांकडून शोध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून सोमवार, 21 मार्च रोजी ती शहरातील एका महाविद्यालयात गेली असता ा घरी परतली नाही. त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुलीच्या वडीलांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गबाडे करीत आहेत.






धुळ्यातील पाच कंदील परीसरातील शंकर मार्केटला आग : 40 दुकाने खाक


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !