एमआयडीतील कंपनीत चोरी : गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये चोरी प्रकरणातील पसार असलेल्या संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. आकाश उर्फ बंटी अंकुश जाधव (रा.सुप्रीम कॉलनी) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

संतापजनक : 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चुलत बहिणीच्या प्रियकराने केला बलात्कार

चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
एमआयडीसीतील वीस हेक्टर येथे श्रीराम पॉलिमर्स चटई दाणा कंपनीमध्ये 13 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी 25 जानेवारी रोजी कंपनीच्या निकिता राजेंद्र महाजन रा. मेहरुण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी उपेश ऊर्फ साई सोनाजी आठे यास अटक केली होती. त्याच्याकडून 8 हजार 600 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला होता. तर त्याचा साथीदार आकाश उर्फ बंटी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.






गोपनीय माहितीवरून अटक
संशयीत आकाशबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे व विकास सातदिवे यांच्या पथकाने त्याला मंगळवारी सुप्रीम कॉलनी येथून अटक केली.

नोकरीच्या बहाण्याने लोकायुक्त इन्स्पेक्टरने केला तरुणावरच अनैसर्गिक अत्याचार


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !