चिमुकलीवर अत्याचार करणार्‍या धरणगाव तालुक्यातील नराधम आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप


जळगाव : आठ वर्षांच्या मतिमंद चिमुकलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप शिक्षा आणि दंडाची शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाने सुनावली.

2020 मध्ये झाला होता अत्याचार
धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी 8 वर्षीय मतिमंद चिमुकली ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. 24 नोव्हेंबर 2020 सकाळी 10.30 ते 11.30 वाजेच्या सुमारास चिमुकली घरी असताना गावातील आरोपी रमेश मंगा कळस्कर याने मुलीला घरात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करून अत्याचार केला. याबाबत धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस ठाण्यात रमेश मंगा कळस्कर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.






जळगाव न्यायालयात खटला
या गुन्ह्याचा खटला जळगाव व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात करण्यात आली. यात सरकारी वकील ड. निलेश चौधरी यांनी जोरदार युक्तिवाद केला. यामध्ये एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीत, पीडितेचे वडील, पंच, तपासी अंमलदार आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. या खटल्यात पीडित चिमुकली ही मतिमंद असल्याने तिची साक्ष नोंदण्यासाठी गुजराती मूकबधीर विद्यालयाचे विशेष शिक्षक यांच्या मदतीने सांकेतिक भाषाद्वारे, इशारे आणि खाणाखुणाच्या आधारे नोंदविण्यात आली. घटनेच्या दिवशी पिडीत चिमुकली ही घाबरलेल्या अवस्थेत रडत आरोपीच्या घरातून बाहेर पडताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे अत्याचार करणारा रमेश मंगा कळस्कर याला दोषी ठरविण्यात आले.

आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप
बुधवारी न्यायमूर्ती खडसे यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता आरोपी रमेश कळस्कर याला विविध कलमान्वये नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि 6 हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील निलेश चौधरी यांनी प्रभावी युक्तीवाद केला. या खटल्याकामी पैरवी अधिकारी देविदास काळी व केस वॉच विलास पाटील यांनी सहकार्य केले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !