अंतुर्लीत स्वामीत्व योजनेच्या गावठाण मोजणीस प्रारंभ
पाचोर्यात आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या उपस्थितीत मोजणी : ग्रामस्थांना मिळणार दुरोगामी लाभ
पाचोरा : राज्य शासनाच्या स्वामीत्व योजने अंतर्गत गावठाण मधील जमिनींच्या ड्रोन मोजणी अभियानास पाचोरा तालुक्यात शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता आमदार किशोरअप्पा पाटील यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला. स्वामीत्व योजनेअंतर्गत राज्यातील गावठाण भागातील आठ अ ला ग्रामपंचायत उतार्यावर लावलेल्या जमिनींची ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करून त्याच्या मिळकत पत्रिका तयार केल्या जाणार असून यामुळे गावागावातील वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद मिटण्यासाठी मदत मिळणार आहे. या मोजणीचा आगामी 100वर्षे फायदा मिळणार आहे तसेच मिळकत धारकांचे नावे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार असल्याने त्यांना शासनाच्या घरकुलासह तारण, गृहकर्ज आदी लाभ मिळणार असल्याने ग्रामस्थांमधून या योजनेचे स्वागत होत असल्याचे चित्र आहे.
कवठळला चोरट्यांनी दिड लाखांचे दागिने लांबवले
अंतुर्लीतून योजनेचा शुभारंभ
पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर अप्पा पाटील यांचे मुळगाव अंतुर्ली येथून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, भूमीअभिलेख अधिकारी राजू घेटे, यशवंत बिर्हाडे, मोजणी अधिकारी उगल मुगले चौधरी, सरपंच तुळसाबाई पाटील,उपसरपंच प्रदीप लक्ष्मण पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.





आपसातील तंटे मिटण्यास होणार मदत
आमदार किशोर अप्पा पाटील यांनी राज्य शासनाच्या या योजनेच्या या योजनेचे कौतुक करत यामुळे आपसातील तंटे सुटण्यास मदत मिळणार असल्याने गावा गावात सलोखा निर्माण होण्यास यामुळे मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन करून ग्रामस्थांनी या ड्रोन मोजणी अधिकार्यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष बंडू चौधरी, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.
