नांदेडात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीकाची पाच कोटींच्या खंडणीसाठी गोळ्या झाडून हत्या


Sanjay Biyani नांदेड : नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर शारदानगर येथील घरासमोर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांची हत्या (Builder Shot Dead In Nanded Unidentified Assailants Fired Bullets Driver Injured) केली. ही घटना मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. 31 सेकंदांचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा नांदेड शहर हादरले आहे.

पाच कोटींच्या वादातून हत्या
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी सराईत गुन्हेगार हरविंदरसिंघ रिंधा टोळीच्या दोघांनी बियाणी यांच्या कार्यालयात जावून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर त्यांना अंगरक्षक दिला होता. वर्षभरापूर्वी पोलिस प्रशासनाने त्यांना खर्च भरून अंगरक्षक ठेवण्यास सांगितले होते. पण त्यांनी याला नकार दिल्याची, माहिती मिळत आहे.

हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद
शारदानगर येथे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कारमध्ये बसून आपल्या घरासमोर आले. कार उभी करून ते खाली उतरले व कारच्या पाठीमागून घराच्या दिशेने जात असतानाच एका भरधाव दुचाकीवर काळ्या रंगाचे कपडे घातलेले दोघे आले व कारसमोर दुचाकी उभी करून संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. गोळीबार होताच संजय बियाणी आणि त्यांचा जखमी ड्रायव्हर रवी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान संजय बियाणी यांचा मृत्यू झाला.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

चालक जखमी
गोळीबार होताच संजय बियाणी (Sanjay Biyani) आणि त्यांचा जखमी ड्रायव्हर रवी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान संजय बियाणी यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णालयासमोर मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. दरम्यान, घटनेनंतर आनंदनगर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती तसेच काही दुकानांवर दगडफेकही करण्याचा प्रयत्न झाला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !