अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नाकारण्याचा जळगाव शिक्षणाधिकार्‍यांचा आदेश रद्द


औरंगाबाद : शाळांमधील अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीस मान्यता नाकारण्याचा जळगाव शिक्षणाधिकार्‍यांचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.जी. डिगे व न्यायमूर्ती साधना जाधव यांनी रद्दबातल ठरवला.

खंडपीठात दाखल होती याचिका
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील वर्षा दीपक देसले व इतरांनी अ‍ॅड. अजय पवार यांच्यामार्फत खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेनुसार चाळीसगावच्या नालंदा विद्यालयातील मृत कनिष्ठ लिपिक संजय धनसिंग पाटील यांचे चिरंजीव सागर संजय पाटील, पाचोरा येथील कै. परशराम कोंडिबा शिंदे माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत संजय बाळकृष्ण मोरे यांच्या पत्नी संगीता संजय मोरे आणि पाचोरा तालुक्यातील निंभोरी येथील श्रीमंत डी.के. पवार माध्यमिक विद्यालयात कार्यरत मृत शिपाई दीपक सुभाष देसले यांच्या पत्नी वर्षा दीपक देसले यांची अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकीस जळगावच्या शिक्षणाधिकार्‍यांनी (माध्यमिक) मान्यता नाकारली होती. अनुकंपा तत्त्वावरील नेमणूक ही सरळसेवा भरती नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांना सरळसेवा भरतीस लागू असलेले नियम व शासन निर्णय लागू राहणार नाहीत. नवीन संचमान्यतेचा व आकृतिबंधाचा प्रश्नच उद्भवत नाही, असा युक्तिवाद केला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !