विवाहितेचा छळ : पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा


जळगाव : शहरातील जोशी वाडा येथील माहेर असलेल्या विवाहितेला पैशासाठी शिवीगाळ व मारहाण करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा जणांविरोधात गुन्हा
शहरातील जोशी वाडा येथील माहेर असलेल्या रेहानाबह कुरबान खान (वय-25) यांचा विवाह जळगावातीलच आझाद नगर, पिंप्राळा येथील कुरबान खान इस्माईल खान याच्यासोबत रितीरिवाजानुसार झाला. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती कुरबान खान याने विवाहितेला माहेरहून पैसे आणावे यासाठी तगादा लावला. परंतु माहेरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विवाहितेने माहेरून पैसे आले नाही. त्याचा राग मनात धरून पती कुरबान खान याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर सासू, सासरे दिन आणि नणंद यांनी देखील विवाहितेकडे पैशांचा तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान 6 एप्रिल रोजी विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली आहे.






यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
विवाहितेच्या तक्रारीवरून पती कुरबान खान इस्माइल खान, सासु फरिदा खान इस्माईल खान, सासरे इस्माईल खान, दीर शेर खान इस्माईल खान, सुभान खान इस्माईल खान आणि सुलतानाबी हसन खान सर्व रा. आजाद नगर, पिंप्राळा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !