विवाहितेचा साडेतीन लाख रुपये न आणल्याने छळ : चौघांविरोधात गुन्हा


जळगाव : रामेश्वर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेने साडेतीन लाख रुपये माहेरहून आणावे या मागणीसाठी पतीसह सासरकडील मंडळींकडून छळ केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या श्रद्धा तुषार हिप्पर (23) यांचा विवाह 2019 मध्ये मनमाड येथील तुषार ज्ञानेश्वर हिप्पर यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती तुषार हिप्पर याने माहेरहून साडेतीन लाख रुपये आणण्याची मागणी केली परंतु विवाहितेने पैसे न आल्यामुळे तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. सासू, सासरे आणि दीर यांनी देखील पैशांसाठी विवाहितेला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहिता या माहेरी रामेश्वर कॉलनी जळगाव येथील निघून आल्या. बुधवार 16 एप्रिल रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.






यांच्या विरोधात गुन्हा
विवाहितेच्या तक्रारीवरून पती तुषार ज्ञानेश्वर हिप्पर, मंगलाबाई ज्ञानेश्वर हिप्पर, ज्ञानेश्वर आनंदा हिप्पर आणि अक्षय ज्ञानेश्वर हिप्पर (सर्व रा.मनमाड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !