हुंडाई शोरूमजवळ चाकू लावून तरुणाला लुटले
Jalgaon Crime जळगाव : चाकूचा धाक दाखवत तरुणाकडील मोबाईलसह रोकड लांबविण्यात आली. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील हुंडाई शोरूमजवळ बुधवार, 6 रोजी घडली. या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात (Jalgaon Jilha Pet Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.
दुर्दैवाचा असाही फेरा : रेल्वे चुकली अन् मृत्यूने दोघा विद्यार्थ्यांना गाठले
महामार्गावर लूट झाल्याने खळबळ
अनुभव सौरभ नायक (26, रा.शिव कॉलनी, जळगाव) हा तरुण मार्केटींग डायरेक्टर म्हणून काम करतो. बुधवारी 6 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजेया दरम्यान अनुभव नायक हा राष्ट्रीय महामार्गावरील हुंडाई शोरूमजवळून जात असतांना अज्ञात दोन जण दुचाकीवर आले. यातील दुचाकीच्या मागे असलेल्या एकाने अनुभवला चाकूचा धाक दाखविला आणि खिश्यातील 10 हजारांचा मोबाईल आणि 700 रुपयांची रोकड मिळून एकूण 10 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी अनुभव नायक याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा (Jalgaon Jilha Pet Police Station) दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार (api kishor pawar) करीत आहे.





