राष्ट्रवादी नेते एकनाथराव खडसेंना विधान परीषदेची उमेदवारी : मुक्ताईनगरात समर्थकांचा जल्लोष

समर्थकांचा उत्साह दुणावला : कार्यकर्त्यांना आता माजी महसूल मंत्री खडसेंना मंत्री पद मिळण्याची आशा


मुक्ताईनगर : माजी महसूल मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना विधान परीषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुक्ताईनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व समर्थकांनी प्रवर्तन चौकात फटाके फोडून व ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणे डीजेवर वाजवत एकाच जल्लोष केला. दरम्यान, ऑक्टोबर 2020 मध्ये खडसेंनी भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता मात्र सुमारे दोन वर्षांपासून त्यांच्याकडे मोठे पद नव्हते तर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव असतानाही यादी मंजूर झाली नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात होते मात्र आता राष्ट्रवादीने अधिकृतरीत्या खडसेंना विधानपरीषदेची उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले असून आता मंत्रीपदही मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.

प्रवर्तन चौकात कार्यकर्त्यांचा जल्लोष
जल्लोषप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू माळी, माजी सभापती विलास धायडे, दशरथ कांडेलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य किशोर चौधरी, आसीफ बागवान, प्रवीण पाटील, बापू ससाणे, नगरसेवक शेख शकील, संदीप जुमले, बबलू सापधरे, सुनील काटे, आमिन खान, दीपक साळुंके, पवनराजे पाटील, नंदू हिरोळे, शिवराज पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी प्रवर्तन चौकात डिजेवर राष्ट्रवादी पुन्ह, या गाण्यावर ठेका धरीत जल्लोष साजरा केला.

भुसावळातील तरुणाचे खून प्रकरण : दोघा आरोपींना 13 पर्यंत कोठडी

खडसेंच्या खर्‍या अर्थाने पुर्नवसन
आपल्या आयुष्यातील गेले 40 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी काम केलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गेल्या 18 महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून एकनाथराव खडसे यांचे नाव दिले होते परंतु गेल्या दीड वर्षांपासून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी 12 राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी बाहेर काढलेच नाही. आता होत असलेल्या विधान परीषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी खडसे यांचे राजकीय पुनर्वसन केले असून त्यांना विधान परीषदेचे तिकीट जाहीर केल्याने मुक्ताईनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व खडसे समर्थक यांनी चौकात फटाके फोडून व डीजेच्या तालावर नाचत जल्लोष साजरा केला.

तर खडसे मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार
राष्ट्रवादी प्रवक्ते व अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नवाब मलिक व तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भोवती ईडी फेरा सुरू असल्याने पक्षही अडचणीत आला आहे त्यामुळे दोन जागांमध्ये आगामी काही दिवसात फेरबदलाची शक्यता आहे. खडसेंना विधानपरीषदेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांना एक प्रकारे पक्षाने बळ दिले आहे शिवाय मंत्री मंडळाचा विस्तार झाल्यास त्यात खडसे यांना मंत्री पदाचीही संधी मिळू शकते व त्या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला यश तसेच खान्देशात पक्ष विस्तार वाढण्यास मदतही होणार आहे.

भुसावळ स्थानकावर संशयास्पद बॅग आढळते तेव्हा….!


कॉपी करू नका.