भुसावळात आज काँग्रेसतर्फे सत्याग्रह आंदोलन


भुसावळ : शहरातील यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ मंगळवर, 26 रोजी सकाळी 10.30 वाजता काँग्रेसतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.

शहरातील पदाधिकार्‍यांना उपस्थितीचे आवाहन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या आदेशानुसार व जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भाजपा सरकार ईडीच्या माध्यमातून त्रास देत असल्याने या कृतीच्या निषेधार्थ भुसावळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे शांततामय मार्गाने सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील उपस्थित राहतील. शहर काँग्रेस पदाधिकारी, महिला काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी, अल्पसंख्यांक विभाग पदाधिकारी, मागासवर्गीय विभाग पदाधिकारी, सेवा दल पदाधिकारी इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित द्यावी, असे आवाहन शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रवींद्र निकम, जिल्हा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष मो.मुन्वर खान, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !