भुसावळ रोटरी रेलसिटीतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले : शाळेचे नाव उंचावण्याचे मान्यवरांचे आवाहन


भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे दत्तक घेतलेल्या मुसाळतांडा येथील जि.प. शाळेत जॉय ऑफ गिव्हिंग उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत क्लबच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व आरोग्यदायी वस्तूंचे वाटप केले. विकास भराडे यांनी वॉटरबॅग, मनोज सोनार यांनी वह्या आणि पुस्तके, अमित भडंग यांनी स्टेशनरी, कपिल मेहता यांनी मुलांसाठी खाऊ तर अध्यक्ष डॉ.मकरंद चांदवडकर यांनी टूथब्रशची भेट दिली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष डॉ.मकरंद चांदवडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शरीर, मन आणि बुद्धी स्वच्छ असेल तर आपण जग पादाक्रांत करू शकता, खूप मेहनत करून आपल्या गावाचे आणि शाळेचे नाव जागतिक पातळीवर मोठे करा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन मुसाळतांडा जि.प.शाळेचे प्रवीण मोरे यांनी तर आभार मुख्याध्यापक दीपक सुरवाडे यांनी मानले. या प्रसंगी रेलसिटीचे अध्यक्ष डॉ.मकरंद चांदवडकर, सचिव सन्मित पोतदार, प्रोजेक्ट चेअरमन मनोज सोनार, रोटरी सदस्य अमित भडंग, रणजीत खरारे व मुसाळतांडा ग्रामस्थ उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !