रावेरातील दिड कोटींचे भ्रष्टाचार प्रकरण : तत्कालीन बीडीओंचा कसून शोध


रावेर : रावेर पंचायत पंचायत समितीतील वैयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्रचार प्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी हबीब तडवी यांचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी दिली. अटकेत असलेल्या दोन्ही आजी-माजी अधिकार्‍यांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वारंवार लाभ घेणारे लाभार्थी रडारवर
जिल्हाभरात गाजत असलेल्या रावेर पंचायत समितीतील वैयक्तीक शौचालयात योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी हबीब तडवी यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दोन वेळेस पोलिस त्यांच्या घरी जाऊन आले परंतु ते मिळाले नाही तसेच त्यांचा मोबाइलदेखील बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. भ्रष्टाचारातील गुन्ह्याच्या तपासा संदर्भात रावेर पंचायत समिती कडून काही टिपण्या मागवण्यात आल्या आहेत. अनुदानाचा वारंवार लाभ घेणारे लाभार्थी आमच्या रडारवर असल्याचे तपास अधिकारी सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !