आगामी निवडणुकांबाबत भुसावळात आज राष्ट्रवादीची बैठक
NCP Meeting Today in Bhusawal Regarding Upcoming Elections भुसावळ : आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणूकी संदर्भात चर्चा, व राष्ट्रवादी सदस्य नोंदणी अभियान राबवण्याबाबत राष्ट्रवादीची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्रभैय्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनि मंदिर वॉर्डातील चौधरी यांच्या कार्यालयात मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता होत आहे.
निवडणुकीबाबत आढावा बैठक
आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परीषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा व राष्ट्रवादी सदस्य नोंदणी तथा आढावा बैठक घेण्यात येणार असल्याने शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे तसेच शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी केले आहे.

कुटुंब घरात झोपले असतानाच मालोदमधून चोरट्यांनी लांबवले अलगद सव्वा दोन लाखांचे दागिने
