Bike Theft Trio Caught In MIDC Police Net दुचाकी चोरी करणारे त्रिकूट अडकले एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Bike Theft Trio Caught In MIDC Police Net जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील तरुणाची दुचाकी लांबविल्या प्रकरणात तपासादरम्यान एमआयडीसी पोलिसांनी रेकॉर्डवरील तिघा गुन्हेगारांना अटक केली आहे. भूषण नितीन तावडे (20), निखीत सुधाकर तावडे (वय-20) व पंकज दंगल तावडे (24, सर्व रा. चिरणे, कंदाणे, ता.शिंदखेडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. संशयीतांनी शिरसोली येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याने दुचाकी हस्तगत करण्यात आली.
दुचाकी चोरीचा उलगडा
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील बारी नगरातील केतन गोपाल बारी (23) या तरुणाची घरासमोरुन दुचाकी लांबविल्यात आल्याची घटना 30 जून रोजी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, भुसावळ शहर पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेलेल्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्या गुन्ह्यात अटक करताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

