Bhusawal Tahsildar’s Forged Order Of plot Sale Case : Recovery Officer Ravindra Dhande Finally Granted Bail भुसावळातील तहसीलदारांच्या बनावट आदेशाने प्लॉट विक्री प्रकरण : वसुली अधिकारी रवींद्र धांडेंना अखेर जामीन
Bhusawal Tahsildar’s Forged Order Of plot Sale Case : Recovery Officer Ravindra Dhande Finally Granted Bail भुसावळ : तहसीलदारांच्या बनावट आदेशाने प्लॉट विक्री प्रकरणी अटकेतील आरोपी तथा जनकल्याण अर्बन संस्थेचे विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांची मंगळवारी भुसावळ सत्र न्यायालयाचे न्या.जंगम स्वामी यांनी 15 हजारांच्या जात मुचलक्यावर तसेच पोलिसांनी बोलावल्यानंतर हजेरी लावण्याच्या अटीवर जामिनावर सुटका केली.
असे आहेत नेमके प्रकरण
भुसावळातील जनकल्याण अर्बन संस्थेचे विशेष वसूली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांची बनावट सही व शिक्का याचा वापर करीत संस्थेचे दहा प्लॉट परस्पर विक्री केल्याची बाब उघड झाल्यानंतर धांडेसह संस्थेचे प्लॉट घेणार्या दहा जणांविरूध्द येथील शहर पाोलिस ठाण्यात रविवार, 17 जुलै रोजी हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात भुसावळचे नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व क्लार्क शाम तिवारी यांना शहर पोलिसांनी रविवारी अटक केल्यानंतर न्यायालयाने सोमवारी त्यांना तीन दिवसांची अर्थात 4 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

वसुली अधिकार्याची जामिनावर सुटका
मुख्य संशयीत व पतसंस्थेचे वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. धांडे यांच्या वतीने अॅड.राजेंद्र राय यांनी भुसावळ सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यावर मंगळवारी न्या.जंगम स्वामी यांच्या न्यायासनापुढे कामकाज झाले. 15 हजारांच्या जात मुचलक्यावर धांडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.
