Molestation In Bhusawal : Offense Against One परप्रांतीय तरुणीचा भुसावळात विनयभंग : एकाविरोधात गुन्हा
Molestation In Bhusawal : Offense Against One भुसावळ : कर्नाटक राज्यातील 24 तरुणीला फैजपूर ते भुसावळ दरम्यान दुचाकीवरून बसवून आणल्यानंतर बसस्थानकात तिच्याशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी सावदा, ता.रावेर येथील एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बसस्थानकावर केली जबरदस्ती
कर्नाटक राज्यातील 24 वर्षीय तरुणीला संशयीत आरोपी दानीश खान सलीम खान (सावदा, ता.रावेर) याने 15 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी पावणेसात वाजता फैजपूर ते भुसावळ दरम्यान लिप्टच्या बहाण्याने विनयभंग केला तसेच बसस्थानकाही तिच्या अंगलट करीत लज्जास्पद वर्तन करीत हॉटेलमध्ये नेण्यासाठी जबरदस्ती केली. या प्रकरणी पीडीतेने सोमवार, 1 ऑगस्ट 2022 तक्रार दिल्याने बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.

