भुसावळात धावत्या रेल्वेखाली अनोळखीचा मृत्यू
भुसावळ : धावत्या रेल्वेखाली आल्याने 50 ते 55 वर्षीय अनोळखी इसमाचा शहरातील शासकीय औद्योगिक आयटीआय शेजारील खांबा क्रमांक 441/33 ते 35 जवळ 30 जून 2022 रोजी सायंकाळी 5.39 वाजता मृत्यू झाला होता.
ओळख पटत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
या घटनेतील मयताची अद्यापही ओळख पटू न शकल्याने शहर पोलिसांनी अनोळखीची ओटख पटवण्याचे आवाहन केले आहे. मयताची उंची पाच फूट दोन इंच, अंगावरील कपडे फाटके असून सोबत हॅण्डबॅग आढळली आहे. शहर पोलिसात शिवराज प्रजापती यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताबाबत काही माहिती असल्यास हवालदार शशीकांत सुरेश पाटील (86685-56544) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

