शिरसाड ग्रामपंचायतच्या मालकीच्या केसिंग पाईपाची चोरी : एकाविरुद्ध गुन्हा
यावल : तालुक्यातील शिरसाड ग्रामपंचायतीच्या मालकीच्या कुपनलिकेसाठी घेतलेले 30 हजार रुपये किंमतीचे केसिंग पाईपचे दहा नग गावातीलच एकाने चोरी केले. हा प्रकार निर्दशनास आल्याने सरपंच यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंचांच्या तक्रारीवरून गुन्हा
शिरसाड येथील सरपंच दीपक वामन इंगळे यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, ग्रामपंचायतीच्या कुपनलिकेसाठी 30 हजार रुपये किंमतीचे दहा नग केसिंग पाईप ग्रामपंचायतीने खरेदी केले होते. हे पाईप हे गावातीलच गजानन भगवान अलकारी याने चोरून नेले. हा प्रकार निर्दशनास आल्याने यावल पोलिसात गजानन अलकारी यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सिकंदर रमजान तडवी करीत आहेत.

