भुसावळात पोलिस विभागातर्फे 6 रोजी तक्रार निवारण दिन


भुसावळ : भुसावळ शहरातील तीनही पोलिस ठाण्यांमध्ये अर्ज केल्यानंतर समस्या सुटलेल्या नसल्यास अशा नागरीकांसाठी तक्रार निवारण दिनाचे शनिवार, 6 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान भुसावळ शहर पोलिस ठाण्यात करण्यात आले आहे. भुसावळ शहर, बाजारपेठ वा तालुका पोलिस ठाणे हद्दीतील ज्या नागरीकांनी पोलिस ठाण्यात काही अर्ज केले असल्यास वा नागरीकांच्या अन्य स्वरूपाच्या तक्रारी असल्यास त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.

अवैध सावकारीबाबत तक्रारी करण्याचे आवाहन
शहरातील अवैध सावकारीबाबत तोंडी स्वरूपात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून ज्या नागरीकांना व्याजाने पैसे देऊन कुणी वसुलीसाठी व अन्य मार्गाने त्रास देत असल्यास शिवाय वसुलीसाठी एटीीएम कार्ड ठेवून घेतले असल्यास तसेच घराचे, प्लॉटचे वा अन्य संपत्तीचे कागदपत्र स्वतःच्या ताब्यात ठेवून घेतले असल्यास अशा नागरीकांनी कोणतीही भीती न बाळगता तक्रार मांडण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !