भाजपाची भुसावळ शहर शिक्षक आघाडीची कार्यकारीणी जाहीर
अध्यक्षपदी तुषार चिंधडे तर उपाध्यक्षपदी बी.एन.पाटील व रेखा संजय चौधरी
BJP’s Bhusawal City Teachers’ Alliance announced भुसावळ : भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे संघटन मजबुतीसाठी पक्ष विस्तार करण्यात येत आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर शिक्षक आघाडी कार्यकारणी घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी तुषार चिंधडे तर उपाध्यक्षपदी बी.एन.पाटील व रेखा संजय चौधरी यांची निवड करण्यात आली.
यांची निवडीप्रसंगी उपस्थिती
भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे व शहराध्यक्ष परीक्षित बर्हाटे यांच्याहस्ते शिक्षक आघाडीचे नुतन अध्यक्ष तुषार चिंधडे व पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देऊन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. यावेळी शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

अशी आहे नूतन कार्यकारीणी- अध्यक्ष- तुषार चिंधडे, उपाध्यक्ष- बी.एन.पाटील व रेखा संजय चौधरी, सरचिटणीस- गणेश त्रिपाठी, शैलेंद्र महाजन,
कोषाध्यक्ष- समीर तडवी, प्रसिद्धीप्रमुख- मेघश्याम शिंदे, राहुल चौधरी,
चिटणीस- प्रकाश दलाल
समस्या सोडवण्यास प्राधान्य : तुषार चिंधडे
आगामी काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तसेच विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे नुतन अध्यक्ष तुषार चिंधडे यांनी सांगितले.
