रावेरचे पत्रकार कृष्णा पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
रावेर : शहरातील दिव्य मराठी दैनिकाचे ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील यांना मुंबई येथील सेलेब्स अँड गॉसीप्स या संस्थेने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण स्वातंत्र्यदिनी अंबरनाथ येथील कार्यक्रमात करण्यता येईल.
उल्लेखनीय कार्याची दखल
गेल्या 30 वर्षापासून पत्रकारीतेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना पत्रकार कृष्णा पाटील यांना मुंबई येथील सेलेब्स अँड गॉसीप्स या संस्थेने राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार जाहीर केला आहे. सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जळगाव जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी निवड झालेले ते एकमेव पुरस्कारार्थी आहेत.

शौचालय अनुदान उघडकीस आणण्यात मोठी भूमिका
कृष्णा पाटील यांनी आजवर निर्भीड पत्रकारीता केली असून अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी रावेर पंचायत समितीतील शौचालय अनुदान वितरणाचा घोटाळा उघडकीस आणला असून तो जिल्हाभर गाजत आहे. रोखठोक व निर्भीड पत्रकारीता हे त्यांच्या पत्रकारीतेचे वैशिष्ट्य आहे .समाजावर होणार्या अन्यायाला लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडतानाच भ्रष्ट अधिकार्यांविरुद्ध त्यांनी प्रहार केला आहे. याच त्यांच्या निर्भिड पत्रकारीतेचा महाराष्ट्र रत्न या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात आला असून हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कृष्णा पाटील यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.
