अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून विवाहितेवर वारंवार बलात्कार : आरोपीला अटक


Repeated Rape Of Married Woman After Taking Bath Video : Accused Arrested  औरंगाबाद : बांधकाम मिस्त्रीने कामाला असलेल्या मजुराच्या पत्नीचा अंघोळी व्हिडिओ तयार करून त्याआधारे तिला ब्लॅकमेल केले. वारंवार बलात्कार केल्यानंतरही आरोपी इथेच थांबला नाही तर घडलेल्या व्हिडिओचे चित्रीकरण करून त्याने पीडीतेला पतीला पाठवले. पीडीतेने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. भानुदास किसन घोडे (40, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

व्हिडिओच्या आधारे केले ब्लॅकमेल
भानुदास बांधकाम मिस्त्री आहे. त्याच्याकडे पीडितेचा पती तीन वर्षांपूर्वी कामाला होता. त्यामुळे घोडेचे पीडितेच्या घरी येणे जाणे होते. यातूनच घोडे याने पीडितेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वी मोबाईलमध्ये बनविला. त्यानंतर आठ दिवसांनी त्याने हा व्हिडिओ नवर्‍यासह नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत वेरुळ येथील लॉजवर नेऊन बळजबरीने अत्याचार केले. त्याचाही व्हिडिओ बनविला. या व्हिडिओच्या आधारे त्याने ब्लॅकमेल करीत अनेक वेळा अत्याचार केले.

अखेर पीडीतेच्या तक्रारीनंतर गुन्हा
मागील महिन्यात जय भवानी चौकातील मातोश्री लॉजवर नेऊन अत्याचार केले. त्यावेळी घोडेचा मोबाईल पीडितेने पाण्यात टाकला. मोबाईल पाण्यात टाकल्यामुळे त्यातील व्हिडिओ डिलिट झाल्यामुळे त्याच्यासोबत बोलणे पीडितेने सोडून दिले. 27 जुलैला घोडेने पीडितेला त्याच्याकडे असलेले व्हिडिओ व फोटो पतीसह नातेवाइकांना पाठविण्याची धमकी दिली. यानंतर 2 ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता अनोळखी नंबरवरून पीडितेचा पती आणि बहिणीच्या नवर्‍याच्या मोबाईलवर घोडे आणि पीडितेचे वेरुळ लॉजवर काढलेले व्हिडिओ आणि फोटो पाठविण्यात आले. यानंतर पीडितेने पतीला सोबत घेत मुकुंदवाडी ठाणे गाठले. त्या ठिकाणी घोडेविरोधात अत्याचाराची तक्रार दिली. त्यानुसार निरीक्षक गिरी यांनी गुन्हा नोंदवित आरोपीला बेड्या ठोकल्या.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !