आधी बालिकेवर केला अत्यानंतर नंतर केला खून :  आरोपीला एका दिवसात बेड्या


A minor girl in Maval taluka was killed after being tortured पुणे : राज्यातील अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यात घडला होता. या प्रकरणी कामशेत पोलिसांनी एका दिवसात आरोपीला अटक केली आहे. तेजस उर्फ दादा महिपती दळवी (24) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

बेपत्ता बालिकेवर अत्याचार करीत केला खून
मावळ तालुक्यातील अल्पवयीन बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू असतानाच तिचा मृतदेह आढळला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी दुर्गा श्वानाचा वापर शोध मोहिमेत करण्यात आला.

यांनी केली गुन्ह्याची उकल
या गुन्ह्याच्या शोधामध्ये पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, गणेश तावरे, सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, प्रमोद नवले, समाधान नाईकनवरे प्राण येवले, समीर शेख, जितेंद्र दीक्षित, सागर बनसोडे, अनिल हिप्परकर, नितीन कळसाईत, आशिष झगडे, रवींद्र राऊळ, होमगार्ड प्रशांत कटके, किसन बोंबले आदींच्या पथकाने भाग घेतला होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !