रावेरात सव्वादोन लाखांची रोकड असलेली बॅग लांबवली

भर दिवसा घडलेल्या घटनेने व्यापार्‍यांमध्ये उडाली खळबळ : संशयीताविरोधात गुन्हा


Raver handed over a bag containing cash of Rs 2.25 lakh रावेर : सव्वादोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी भर दिवसा लांबवल्याची घटना शहरातील ओम सुपर शॉपीजवळील रूपम शॉपींग समोर बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पाळत ठेवून चोरट्याने ही चोरी केल्याचा अंदाज आहे. रावेर पोलिसात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारदाराच्या वर्णनासह सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

संधी मिळताच लांबवली बॅग
तक्रारदार तथा सेवानिवृत्त कर्मचारी अशोक छोटू पाटील (64, जुना सावदा रोड, तिरुपती नगर, रावेर) यांनी कामानिमित्त सव्वादोन लाखांची रोकड बँकेतून काढल्यानंतर ती एका लहान बॅगेत ठेवली व कामानिमित्त ते रूपम शॉपींग मॉलच्या बांधकाम सुरू असलेल्या जागी आले असता त्यांनी स्कुटीलाच बॅग अडकलेली ठेवली व याचवेळी पाळत ठेवून असलेल्या व अंगात निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या सडपातळ चोरट्याने संधी साधून बॅग लांबवली. या बॅगेत सव्वादोन लाखांची रोकड तसेच बँक ऑफ महाराष्ट्र व आयडीबीआय बँकेचे पासबुक होते. पाटील यांनी रावेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !