भुसावळातील नायब तहसीलदारांसह क्लर्क यांच्या पोलिस कोठडीत वाढ
भुसावळ : भुसावळ तहसीलदारांच्या बनावट आदेशाने प्लॉट विक्री प्रकरणात अटकेत असलेले नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व शाम तिवारी यांना गुरुवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
फसवणूक प्रकरणी दाखल आहे गुन्हा
भुसावळातील जनकल्याण अर्बन संस्थेचे विशेष वसूली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांचे आदेशाचे बनावट सही व शिक्का याचा वापर करीत संस्थेचे दहा प्लॉट परस्पर विक्री केले होते तर धांडेसह संस्थेचे प्लॉट घेणार्या दहा जणांविरूध्द येथील शहर पाोलिस ठाण्यात रविवार, 17 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील धांडे यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर नायब तहसीलदार शशिकांत इंगळे व लिपीक शाम तिवारी यांना अटक करण्यात आली व न्यायालयान त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती व मुदत गुरुवारी संपताच न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

