मसाजच्या नावाखाली जोमात सुरू होता वेश्या व्यवसाय : पोलिसांच्या कारवाईने पळापळ
पुणे : साळुंके विहार परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणार्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. वेश्याव्यवसायातून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे. यात एक छत्तीसगड, एक पश्चिम बंगाल व दोन महाराष्ट्रातील तरुणी आहेत.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
याप्रकरणी स्पा मॅनेजर झारणा ऊर्फ पिंकी गौतम मंडल (27, रा.कोंढवा, पुणे, मु.रा. पश्चिम बंगाल), सुमीत अनिल होनखंडे (21, रा. कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. स्पा मालक रचना संतोष साळुंखे (रा. येवलेवाडी, पुणे), सार्थक लोचन गिरमे (रा. वानवडी, पुणे) व लोचन अनंता गिरमे (रा.पुणे) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

