ग्रामस्थांनी पाठराखण करावी असेच कार्य तलाठ्यांनी करावे : कैलास कडलग

रावेर शहरात महसूल दिनानिमित्त गुणवंत कर्मचार्‍यांचा सत्कार


रावेर : गाव पातळीवर आपल्या कर्तृत्वामुळे आणि महसुली सेवांचा लाभ मिळवून देण्याच्या वृत्तीने गावपातळीवर आपली पाठराखण ग्रामस्थांनी करावी यासाठी सर्व तलाठी यांनी आपले कर्तव्य बजावणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी रावेर येथे महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. रावेर तहसील कार्यालय आवारात आयोजित कार्यक्रमप्रसंगी तहसीलदार उषाराणी देवगुणे, नायब तहसीलदार संजय तायडे आदी उपस्थित होते.

महसुली दाखल्यांचे वाटप
प्रास्ताविक विठोबा पाटील यांनी केले. या नंतर सात बारा उतारे, रेशन कार्ड, मतदान ओळख पत्र आदी महसुली दाखल्यांचे वाटप केले. उत्कृष्ट कर्मचारी कोतवाल प्रेमसिंग पावरा, चालक अरविंद बोरसे, पोलिस पाटील मनीषा पाटील, महसूल सहाय्यक शिवकुमार लोलपे, तलाठी दादाराव कांबळे, अव्वल कारकून सलीम तडवी, मंडळ अधिकारी यासीन तडवी, नायब तहसीलदार संजय तायडे व निकिता चौधरी यांचा सत्कार प्रमाणपत्र देवून करण्यात आला. यावेळी तलाठी बर्वे आणि शिक्षिका गजाला तबस्सुम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महसूल दिनानिमित्त अधिकारी वर्गाचे अभिनंदन रावेर येथील तिरुपती अंग्रो प्लास्टचे संचालक दिलीप अग्रवाल यांनी केले.

महसूल विभागाचा नावलौकीक वाढवावा
तहसीलदार अभिलाषा देवगुणे म्हणाल्या की, आपल्या कार्यकाळातील सहकारी वर्गाचे मिळालेले सहकार्य मोलाचे आहे. असेच कार्य करून महसूल विभागाचा कर्मचार्‍यांनी नावलौकिक वाढवावा. सूत्रसंचालन जे.डी.बंगाडे यांनी तर आभार दीपक गवई यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !