Professor’s murder due to immoral Relationship : Two arrested along with his wife प्रेमाआड आलेल्या प्राध्यापक पतीचा पत्नीने प्रियकराला सोबत घेवून केला खून


Professor’s murder due to immoral Relationship : Two arrested along with his wife यवतमाळ : विवाहानंतर बहरलेल्या प्रेमात पती आडवा येत असल्याने पत्नीने प्रियकराला सोबत घेत पतीचा काटा काढला मात्र तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या तर या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. वनपाल धनश्री देशमुख व वनपाल शिवम बचके अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

खून करून मृतदेह फेकला
उमरखेड येथील भाऊसाहेब माने कृषी विद्यालयातील प्राध्यापक सचिन देशमुख यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे आढळला तर शवविच्छेदनातून खून झाल्याची बाब उघड होताच पोलिसांनी तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रीत केले. तसेच खबर्‍यांच्या माध्यमातून प्राध्यापकांबद्दल माहितीही गोळा केली. अनैतिक संबंधातून सचिनचा खून झाल्याचे पुढे आले. या प्रकरणी वनपाल शिवम चंदन बचके (33) रा. आकोट आणि प्रा. सचिन देशमुख यांची पत्नी वनपाल धनश्री देशमुख (28) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर हे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !