पहूर पोलिसांनी रोखली गुटख्याची तस्करी : लाखोंचा गुटखा जप्त
Pahoor police stop Gutkha smuggling: Gutkha worth lakhs seized पहूर : पहूर पोलिसांनी गुटखा तस्करी रोखत वाहन जप्त केले असून लाखोंचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्करांमुळे खळबळ उडाली आहे. जामनेर तालुक्यातील वाकोद ते औरंगाबाद रोडवरून बेकायदेशीररित्या सुगंधित पानमसाला, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पहूर पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांना पाहताच आरोपी पसार
वाकोद ते औरंगाबाद रोडवर असलेल्या रस्त्यावरून मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान, पिकअप वाहन (क्रमांक एम.एच.19 सी.वाय.6881) आल्यानंतर त्याची तपासणी केली असता शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले. पोलीस येत असल्याचे पाहून वाहनावरील चालक हा गाडी सोडून पसार झाला. हवालदार ईश्वर देशमुख यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकांविरोधात पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहे.

