बामणोदमध्ये दारूच्या नशेत एकावर वार
फैजपूर : दारूच्या नशेत एकाला मारहाण करून धारदार वस्तूने वार करून जखमी केल्याची घटना बामणोद, ता.यावल येथे घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा
सुनील पंडित तायडे (49, इंदीरा नगर, बामणोद) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिवाह करतात. बुधवार, 3 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता सुनील हा त्याचा मित्र नरेंद्र छोटू लोहार याच्यासोबत गप्पा मारत असतांना गावातील सागर मुरलीधर सोनवणे याने दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करून धारदार वस्तूने वार करून जखमी केले. याबाबत सुनील तायडे याने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने गुरूवार, 4 ऑगस्ट रोजी दुपारी फैजपूर पोलीस ठाण्यात सागर सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक महेश वंजारी करीत आहे.

