भाजपा व्यापारी आघाडीतर्फे शासकीय कार्यालयांना राष्ट्रपतींची प्रतिमा भेट
भुसावळ : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी, भुसावळ शहर व्यापारी आघाडीतर्फे महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची प्रतिमा विविध शासकीय कार्यालयास भेट म्हणून देण्यात आली. यात प्रामुख्याने प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय तसेच महावितरण कार्यालयास राष्ट्रपतींची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष केशव गेलानी, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष श्याम दरगड, मनीष गोयंका, अनिल चांदवाणी, विनोद चांदवाणी, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर अग्रवाल, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, पवन बुंदेले, शंकर शेळके, भावेश चौधरी, अजय नागराणी, विलास अवचार, मनोज पिंपळे, राहुल तायडे, अनिल पाटील, युवा मोर्चाचे गोपीसिंग राजपूत, संजय बोचरे व व्यापारी बांधवांची उपस्थिती होती.

