सीमेवरील सैनिकांना पाठवल्या राख्या : सावद्यातील भगिणींचा उपक्रम


Rakhyas sent to soldiers on the border: An initiative of the sisters in Savada सावदा : 4 ते 6 ऑगस्ट 2022 दरम्यान ‘एक राखी सैनिकांच्या सन्मानासाठी’ हा उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील देशाच्या सीमेवरील जवानांकरीता अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कोष्टी वाड्यातील, कोष्टी महिला मंडळाने कोष्टी वाड्यासह परीसरातील महिलावर्गाने एकत्रीतपणे रक्षाबंधन हा सण देशाच्या रक्षण रक्षणासाठी सदैव तत्पर असणार्‍या तसेच ऊन, वारा, पाऊस, हिवाळा-उन्हाळा आदी गोष्टीची तमा न बाळगता सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांसाठी साजरा करण्याचे ठरवले आहे. यासाठी 6 ऑगस्टपर्यंत एकत्रीतपणे जमा केलेल्या रकमेतून जम्मू आणि काश्मिर, कारगील, उत्तरप्रदेश व अरुणाचल प्रदेशातील सीमेवरील जवानांसाठी राख्या स्पीडपोस्टद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.

यांचा उपक्रमात सहभाग
या उपक्रमात नेत्रा गणेश कोष्टी, स्वाती अभिजीत कोष्टी, नेहा संजय बन्नापुरे, यांच्यासह वैशाली राजेंद्र कोष्टी, लता सुभाष कोष्टी, सुनीता सुरेश कोष्टी, उर्मिला संजय गरडे, सुशीला बारघरे, मनीषा सुधाकर कोष्टी, वैशाली सतीश नारळे, अपेक्षा योगेश कोष्टी, योगीता चंद्रकांत कोष्टी, रुपाली विकास बावणे, अनिता रेवाले, ज्योती प्रशांत सरोदे आदी सहभागी झाल्या. दरम्यान, जम्मू काश्मीर येथे कार्यरत सुरक्षा दलातील जवान हा सावदा येथे सुटीवर आल्याने त्यास कोष्टी महिला मंडळाने त्यास पुष्प देऊन तसेच रक्षाबंधनाचे औचित्य साधून राखी बांधली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !