ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी 10 संशयीत न्यायालयात हजर


कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात दोष निश्चिती करण्यात येणार होती, त्यासाठी 10 संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले; मात्र याबाबतची सुनावणी पुढील तारखेला घ्यावी, अशी विनंती सरकार पक्षातर्फे करण्यात आल्याने र जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी दोष निश्चितीसाठी 23 ऑगस्टला सुनावणीचे आदेश दिले.

दहा संशयीत न्यायालयात हजर
ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या खूनप्रकरणी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात 10 संशयितांना हजर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार बंगळूरू येथील कारागृहातून अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे, अमित डेगवेकर, अमित बद्दी, गणेश मिस्कीन या सहाजणांना कर्नाटक पोलिसांनी हजर केले. पुण्यातील येरवडा कारागृहातून डॉ. वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे या तीन संशयिताना दुपारी न्यायालयात हजर केले. यापूर्वीच जामिनावर सुटलेला आणखी एक संशयित समीर गायकवाड असे एकूण दहा संशयित न्यायालयासमोर हजर होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !