पती देत होता सतत त्रास : कंटाळून पत्नीने आवळला गळफास


Tired of her husband’s suffering, the wife hanged herself औरंगाबाद : जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथे गुरुवार, 4 ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी खुलताबाद पोलिसांनी पती गणेश त्रिंबकेविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मीरा त्रिंबके (36) असे आत्महत्या करणार्‍या महिलेचे नाव आहे.

त्रास झाला असह्य
मुंबईतील रहिवासी रामभाऊ इंगळे यांची मुलगी मीरा हिचा विवाह 2008 मध्ये गणेश त्रिंबके यांच्यासोबत झाला. या दांपत्याला मुलगा आणि मुलगी आहे. संसार सुरळीत सुरू असताना गेल्या 2 वर्षांपासून गणेश त्रिंबके यास दारू पिण्याची सवय लागली. त्यातून गणेश हा दररोज दारू पिऊन पत्नी मीरा हिला मारहाण करून चारित्र्यावर संशय घेत होता. या त्रासाला कंटाळून तिने घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जनार्दन मुरमे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !